Mon. Oct 25th, 2021

भारतीय वैमानिकाला सुरक्षित परत करा; भारताची पाककडे मागणी

New Delhi: MEA spokesperson Raveesh Kumar and Air Vice Marshal RGK Kapoor at a media briefing in New Delhi, Wednesday, Feb 27, 2019. (PTI Photo/Atul Yadav) (PTI2_27_2019_000072B)

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या हल्ल्यामुळे बुधवारी पाकिस्तानचेही भारतीय हद्दीत तीन विमानं घुसली होती. मात्र भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर देताना पाकिस्तान हद्दीत भारताचे एक विमान पडले. भारतीय हवाई दलाचे एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे व्हिडीओ शेअर केला आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थामान असे या वैमानिकाचे असून त्यांचे काही व्हिडीओ पाकिस्तानने शेअर केले आहे. मात्र पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला परत करा अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.

वैमानिकाला परत करा –

पाकिस्तानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे गेलेले विमान पाकिस्तानात पडल्यामुळे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताने ताब्यात घेतले.

त्यांना पाकिस्तानातुन सोडवण्यासाठी भारताने पाकिस्तानकडे मागणी केली आहे.

तसेच वैमानिकाला ताब्यात घेतल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली आहे.

वैमानिकाला ताब्यात घेऊन पाकिस्तानने जिनिव्हा कराराचे उल्लंघन केले असल्याचे म्हटलं आहे.

तसेच वैमानिकाला कुठल्याही प्रकारची इजा होता काम नये तसेच पाकिस्तानने शेअर केलेल्या व्हिडीओबद्दलही भारताने नाराजी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानचे भारतातील उप उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी संध्याकाळी बोलावून बातचीत केली.

तसेच वैमानिकाला कोणत्याही प्रकारची इजा होता काम नये असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *