Thu. Sep 19th, 2019

धान्यांच्या पॅकेटवर भाजपाची जाहिरातबाजी; नेटकऱ्यांची टीका

0Shares
राज्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती झाली आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था सुरू आहे. तसेच एनडीआरएफची टीम नागरिकांच्या बचावकार्यासाठी तत्पर आहेत. पुरग्रस्तांना मदत पाठविण्यात येत असून धान्यांच्या पॅकेटवर भाजप नेत्यांचे फोटो आणि जाहीरातबाजी केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

धान्यांच्या पॅकेटवर भाजपा नेत्यांचे फोटो आणि जाहिरातबाजी –

पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम रवाना झाली आहे.
सांगलीमध्ये पूरग्रस्तांना मदतीसाठी अन्न धान्यांचे पॅकेट पाठविण्यात आले आहे.
भाजपाने पाठवलेल्या अन्न धान्यांच्या पॅकेटवर भाजपा नेत्यांचे फोटो आणि जाहीरातबाजी होत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार सुरेश हाळवनकर यांचे फोटो धान्यांच्या पॅकेटवर दिसत आहे.
धान्यांच्या पॅकेटवर फोटो लावलेल्यामुळे कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.
पूरग्रस्तांसाठी पाठवलेल्या धान्यांच्या पॅकेटवर जाहिरातबाजी करत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सरकारच्या या जाहिरातबाजीवर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *