Thu. Apr 22nd, 2021

ज्येष्ठ वकील हरीश साळवे वयाच्या ६५ व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह करणार

३८ वर्षांचा संसार केल्यानंतर हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाह करणार…

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे वयाच्या ६५ व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह करणार आहे. ३८ वर्षांचा संसार केल्यानंतर साळवे यांनी पत्नी मीनाक्षी साळवेशी जूनमध्ये  घटस्फोट घेतला होता  

आज २८ ऑक्टोबर साळवे त्यांच्या मैत्रीणीशी ( कॅरोलीन ब्रॉसार्डशी) लंडनच्या चर्चमध्ये लग्न करणार आहे. हरीश साळवे आणि त्यांची पूर्व मीनाक्षी यांना दोन मुली आहेत. साळवेचे गेल्या दोन वर्षांपासून कॅरोलीन यांच्याशी संबंध होते.

कॅरोलीन या ५६ वर्षांच्या आहे आणि त्या व्यवसायाने कलाकार आहेत. हरीश साळवे यांची कॅरोलीनशी भेट एका कला प्रदर्शनात  झाली होती त्यानंतर त्यांची मैत्री झाली त्यानंतर मैत्राच रुपांतर प्रेम झालं. साळवे आणि कॅरोलीन या दोघांचेही दुसरे लग्न आहे. कॅरोलीनला देखील मुलगी आहे.

साळवे यांनी देशातील आघाडीचे उद्योगपती , रतन टाटा,रिलायन्स,व्होडाफोन, मुकेश अंबानी यांचे खटले लढले आहे. शिवाय कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये साळवे यांनी भारत सरकारची बाजू मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *