Thu. Jun 20th, 2019

बीयर पिऊन सिनियर डॉक्टरने केलं इंटर्नचं लैंगिक शोषण!

0Shares

नवी मुंबईतील वाशी येथील एका म्युनिसिपल कॉलेजच्या सीनियर डॉक्टरने इंटर्नचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी  पोलिस ठाण्यात तक्रार केली असून  पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. तसेच आरोपी डॉक्टरला सस्पेंड करण्यात आले आहे.

 

नेमकं काय घडलं ?

पीडित मुलगी ही नवी मुंबईच्या नेरूल येथील एका मेडिकल कॉलेजहून एमबीबीएसचा अभ्यास करत आहे.

तसेच ती नवी मुंबईतील  वाशी येथील म्यूनिसिपल कॉलेजमधून  इंटर्नशिप करत होती.

आरोपी डॉक्टर अनुराग नारवाडे (सर्जन अँड कंसल्टेंट) यांनी 25 मे रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास पीडितेला एका कामासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोबत येण्यास म्हटले.

त्यानंतर पीडित मुलीला बाइकवर बसवून हॉस्पिटलच्या मागील बागेत घेऊन गेला.

नंतर बॅगमधून दोन बिअरच्या बाटल्या काढून मुलीला बिअर ऑफर केली.

तिने नकार दिला आणि तेथून जाण्याचा आग्रह धरला.

मात्र डॉक्टरने तिला अभ्यास आणि तिच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारायला सुरूवात केली.

स्वतःच दोन्ही बिअरच्या बाटल्या पिऊन संपवल्यावर डॉक्टर इंटर्नला जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला.

तिला ‘किस’ करू लागला

या प्रकाराने घाबरलेल्या इंटर्नने  शेवटी त्याला धक्का देत तेथून पळ काढला.

त्यानंतरही डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये येऊन इंटर्नशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न केला.

पण इंटर्नने सकाळ होताच रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल इतरांना सांगितले.

डॉक्टर विरूद्ध घडलेल्या प्रकाराबद्दल तिने तक्रारही केली.

यानंतर डॉक्टरने तिला ‘सॉरी’चे मेसेजेस पाठवले.

डॉक्टरविरूद्ध डीनला तक्रार केल्यावर आरोपी डॉक्टरला सस्पेंड करण्यात आलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: