Tue. Sep 28th, 2021

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर काळाच्या पडद्याआड…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालं. ते 95 वर्षांचे होते.

देशातील महत्त्वाच्या विविध इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी स्तंभलेखनाचं काम केलं होतं. 1997 मध्ये त्यांची राज्यसभेवरही नियुक्ती करण्यात आली होती. एका उर्दू दैनिकाचे पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली, त्यानंतर दिल्लीतील स्टेट्समन या दैनिकाचं संपादकपदही त्यांनी भूषवलं होतं.

एक मानवाधिकार कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी 15 पुस्तकंही लिहिली होती. भारत-पाक संबंधांवरील त्यांची पुस्तकं गाजली आहेत. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते. नय्यर यांना २०१५ मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *