Wed. Jan 26th, 2022

अफगाणिस्तानात सत्तास्थापनेनंतर झाली वरीष्ठ नेत्याची हत्या

  अफगाणिस्तानमध्ये सत्तास्थापनेनंतर तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची हत्या झाली आहे. तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबानच्या एवढ्या वरिष्ठ नेत्याची हत्या झाली आहे. हमदुल्लाह मुखलीस या तालिबानी कमांडरवर हल्ला करण्यात आला आहे. तसेच या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे.

  मंगळवारी सरदार मोहम्मद दाऊद खान सैन्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ बॉम्बहल्ले करण्यात आले. त्यानंतर बेछूट गोळीबारही करण्यात आला. यास पत्युत्तर देत असताना तालिबानचा कमांडर हमदुल्लाह मुखलीस यांचा मृत्यू झाला आहे. हमदुल्लाह मुखलीस कट्टरतावादी संघटना हक्कानी नेटवर्कचा सदस्य होता. त्यांची बादरी स्पेशल फोर्सेसमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *