ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन

सामाजिक, राजकीय जीवानातील लढाऊ ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यना डॉ. एन.डी.पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉ.एन.डी.पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. मात्र सध्या वातावरणात बदल झाल्यामुळे त्यांना ते आजारी होती. दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपाचार सुरू असताना त्यांचे नधन झाले आहे.
डॉ. एन. डी. पाटील यांचा जीवनप्रवास
डॉ. एन. डी. पटील अर्थातच नारायण ज्ञानदेव पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यात ढवळी गावात झाला. तर त्यांनी १९५५ रोजी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम. ए. पदवी घेतली तर १९६२मध्ये त यांनी एल.एल.बी पदवी घेतली.
अध्यापन कार्य
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात (१९५४-१९५७) ते प्राध्यापक होते. तर १९६० साली डॉ. एन. डी. पाटील हे इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात त्यांनी प्राचार्य म्हणून कार्य केले.
शेतकरी कामगार पक्षात प्रवेश – १९४८
मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस – १९५७
१९६० ते १९८२ दरम्यान १८ वर्षात महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य – १९७८-१९८०
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
This is a very carefully managed blog. It makes me want to sign up for the RSS feed 🙂