Jaimaharashtra news

ज्येष्ठ मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं पुण्यात वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्यावर दुपारी १२ वाजता वैकुंठ स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जयराम कुलकर्णी यांच्या मृत्यूमुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

जयराम कुलकर्णी यांनी मराठीतील अनेक सिनेमात भूमिका साकरल्या आहेत. जयराम कुलकर्णी यांनी झपाटलेला या सिनेमात एसीपी जयराम घाटगे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

जयराम कुलकर्णी यांनी अशी ही बनवाबनवी, थरथराट या आणि यासारख्या अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये भूमिका केली होती.

जयराम कुलकर्णी यांनी नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला, बाळाचे बाप ब्रह्मचारी, जो प्रेम दीवाने, झुंज तुझी माझी, दे दणादण, माझा पती करोडपती या आणि अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका मी साकारल्या.

जयराम कुलकर्णी यांनी अभिनय केलेले सिनेमे

बोडकिचा बाजीराव
अभियान
मला जगायचंय
आधार
मी चिरमान बोलतोय
हम दो बंडलबाज
खिलोना बना खलनायक
हिरवा चुडा सुवासिनीचा
जमल हो जमल
बजरंगाची कमाल
माझं सौभाग्य
सासर माहेर
सूडचक्र
झपाटलेला
ग्रहप्रवेश
प्रेम दीवाने
अनुराधा
धरलं तर चावतय
बंडलबाज
माहेरची साडी
आयत्या घरात घरोबा
दे धडक बे धडक
धुमाकूळ
एक पेक्षा एक
गोडी गुलाबी
आमच्या सारखे आम्हीच
आत्माविश्वास
बालाचे बाप ब्रह्मचारी
भूताचा भाऊ
दोस्त माझा मस्त
गावरान गंगू
नवरा बायको
राजाना वाजावला बाजा
थरथराट
माझी पती करोडपती
मज्जाच मज्जा
अशी ही बनवा बनवी
रंगत संगत
नशीबवान
आई तुळजा भवानी
चल रे लक्ष्या मुंबईला
दे दणादण
गंमत जंमत
कशासाठी प्रेमसाठी
खरं करी बोलू नये
खट्याळ सासू नाठाळ सून
धाकटी सून
धोंडी धोंडी पाणी दे
माझा घर माझा संसार
तुज्यावाचून करमेना
अर्धांगी
जुगलबंदी
लेक चालली सासरला
मुंबईचा फौजदार
नवरी मिल नवऱ्याला
सव्वा शेर
धुमधडाका
स्त्रीधन
दुनिया करी सलाम
हा खेल सावल्यांचा

प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून आहेत.

Exit mobile version