पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयाच्या सहसचिवाची आत्महत्या

मंत्रालयामध्ये सहसचिव पदावर काम करणाऱ्या विजयकुमार पवार यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीवरही गोळ्या झाडल्या. घरगुती वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. विजयकुमार यांची पत्नी सोनाली पवार ही या गोळीबारामध्ये जखमी झाली असून त्यांच्यावर सोलापूरमध्ये रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.विजयकुमार भागवत पवार आणि त्यांच्या पत्नीमध्ये नेमका काय वाद होता, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
विजयकुमार पवार मंत्रालयामध्ये सहसचिव पदावर काम करत होते.
मंगऴवेढ्या तालुकामधल्या मरवडे गावी पवारांचे राहते घर आहे.
विजयकुमार पवार आणि सोनाली पवार यांच्यामध्ये सतत घरगुती वाद होत होते.
गुरूवारी उशीरा रात्री पवार आणि त्यांच्या पत्नी सोनाली पवार यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे घरगुती वाद झाला.
यातूनचं पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या, यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.
पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर पवारांनी स्वत: गळफास लावून आत्महत्या केली.
यामध्ये पवार यांनी त्यांच्या पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या, यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.
पवार आणि पती-पत्नीमध्ये नेमका काय वाद होता याचा तपास पोलीस करत आहेत.