Sun. Jun 20th, 2021

मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर बाजाराने उच्चांक गाठला

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. यानंतर शुक्रवारी शेअर बाजाराने उच्चांक गाठला आहे. मुंबई शेअर बाजार 40 हजार अंकांच्या पुढे गेला असून निफ्टीने 12 हजार अंकांच्या पातळीपर्यंत मजल मारली आहे. अनेक वेळा केंद्रात प्रबळ सरकार येण्याची शक्यता दिसली की शेअर बाजारात चांगला फरक पडला आहे. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलं आहे.

निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर परिणाम

शुक्रवारी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर २५४. २५ अंकांनी वधारुन ४०, ०८६.२२ वर पोहोचला.

तर या शेअर बाजाराच्या निफ्टीतही ७९. ३५ अंकांनी वाढ झाली आहे.

स्थिर सरकार सत्तेत येण्याची शक्यता असेल तर शेअर बाजारावर परिणाम होतो.

भाजपने सकाळी अकरा वाजेपर्यंत 300 हून अधिक जागांवर आघाडी घेतली

यानंतर रुपयाही डॉलरच्या तुलनेत 0.26 पैशांनी वधारून 69.40 रुपये प्रति डॉलर झाला आहे.

2014मध्ये मोदीप्रणित भाजप सत्तेत येणार, अशा अंदाजांनंतर सेन्सेक्स 6.8 टक्क्यांनी वधारला होता.

2009 मध्ये UPA सत्तेवर येणार या अंदाजानंतर सेन्सेक्स फक्त 1.9 अंशांनी वधारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *