Tue. Sep 27th, 2022

शेअर बाजारात मंदी, कुणाची चांदी?

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरतोच आहे. याचे परिणाम आता शेअर बाजारात दिसू लागले आहेत. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,100 अंकांनी कोसळला. निफ्टीमध्ये 367 अंकांची घसरण झाली. यातून सावरण्याऐवजी सेन्सेक्स आणखी घसरतच असल्याने शेअर बाजारात भीतीचं वातावरण आहे. आयटी, फार्मा तसंच बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्सना या घसरणीचा सर्वात जास्त फटका बसलाय. येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना रिझर्व्हबँकेने पायउतार होण्यास सांगितलं आहे. त्याचा परिणामही सेन्सेक्सवर दिसून आलाय. येस बँकेच्या शेअर्स भाव सर्वाधिक कोसळले आहेत.

गुरुवारी मोहरमनिमित्त शेअर बाजार बंद होता. शुक्रवारी सेन्सेक्स वधारण्याची शक्यता दिसत होती. सकाळच्या सत्रात शेअर बाजार 300 अंकांनी वधारलाही होता. मात्र दुपारपर्यंत सेन्सेक्स घसरून 35,993 वर पोहोचला. निफ्टीही घसरून 10,866 वर पोहोचला.

काय आहे या घसरणीची कारणं?

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होणारी घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किमती

चीन-अमेरिकेमधील व्यापार युद्ध

मात्र या घसरणीला घाबरण्याचं कारण नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच या मंदीमध्येही बाजारातून बाहेर पडण्याची घाई करू नये, असा सल्ला अनेक बाजार तज्ज्ञ देतात. गुंतवणूकदार या मंदीकडे संधी म्हणून पाहात आहेत. लवकरच बाजार उसळी मारेल असा अंदाज व्यक्त होत आहे. आजच्या दिवशी बाजार बंद होण्यापूर्वी सेन्सेक्सने 900 अंकांनी उसळी मारली. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.