Sun. May 16th, 2021

Exit Poll चा परिणाम : शेअर बाजाराने घेतली 1300 अंकांनी उसळी

लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll चा परिणाम सेंसेक्सवरही दिसून आला. सोमवारी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोमवारी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स चांगलाच वधारला. तसंच ‘निफ्टी’नेही मोठी झेप घेतली.

आज सकाळी मार्केटने १३०० अंकांनी उसळी घेतली आहे तर निफ्टीही ३७७.७५ अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही ६९ पैशांनी मजबूत झाला आहे.

शुक्रवारी सेन्सेक्सचा निर्देशांक ३७, ९३०.७७ अंशांवर बंद झाला होता. आज सकाळी ९४६ अंकांची उचल खात ३८,८२९ अंकांवर पोहोचला.

शुक्रवारी ११, ४०७.१५ अंकांवर बंद झालेला निफ्टी २० अंकांनी वधारला आहे. एकूण ५० कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.

शेअर बाजारात तेजी!

पहिल्या सत्रात सेन्सेक्स ८८८.९१ अंकांनी वधारून ३८,८१९.९१ वर जाऊन पोहोचला.

निफ्टी २८८ अंकांनी वधारून ११,६९१.३० वर जाऊन पोहोचला.

मोदी सरकारच पुन्हा सत्तेत राहणार असल्याच्या Exit Poll अंदाजामुळे उद्योगांच्यादृष्टीने स्थिर वातावरण निर्माण होईल, असा अंदाज आहे.

जवळपास सर्वच Exit Poll च्या अंदाजानुसार NDA सरकारच पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मोदी सरकारने सध्या राबवलेली धोरणं तशीच सुरू राहतील आणि त्यात बदल होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *