Fri. May 7th, 2021

#Budget: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांनी घसरण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांनी घसरण झाल्याचे समजते आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांनी घसरण झाल्याचे समजते आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सेन्सेक्स 40,000 अंकांच्या पार गेला होता. मात्र अर्थसंकल्प पार पडल्यानंतर घसरण बघायला मिळाली.

सेन्सेक्समध्ये घसरण

शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स ४०,००० वर पोहोचला होता. परंतु जसजशी बजट जाहीर झाले तसतसे सेन्सेक्स घसरायला सुरूवात झाली.

दुपारी दीड वाजता सेन्सेक्स सुमारे 353.35 एवढा झाला. म्हणजेच ०.८९ टक्क्यांनी संसेक्स घसरला आहे.

आता सेन्सेक्स 39,554.71 पर्यंत पोहोचला आहे. यात निफ्टीमध्ये 123.25 अंकांनी म्हणजेचं 1.03 टक्क्यांनी घसरला आहे. सेन्सेक्स 11.823.50 पर्यंत पोहोचला आहे.

त्यामुळे हा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारातून नाराजी व्यक्त करण्यात आली अशी चर्चा होत आहे.

सेन्सेक्समध्ये 300 हून अधिक अंकांनी घसरण झाल्याची माहीती मिळाली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *