Tue. Sep 28th, 2021

……आणि नितीन गडकरी संतापले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपूरमध्ये भाषण सुरू असताना काही विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी करत पत्रके सभास्थळी फेकली.

या घोषणाबाजीमुळे संतप्त झालेल्या गडकरींनी ‘शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा’, असे निर्देश पोलिसांना दिले.

नागपूर-नागभीड गेज कन्व्‍‌र्हशन परियोजनेसह महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, मेट्रो, सार्वजानिक बांधकाम विभागाशी संबंधित 23 विकास कामांचे भूमिपूजन बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ घडला आहे.

नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध

नागपूरमध्ये फुटाळा तलाव परिसरात 23 विकास कामांचा भूमिपूजन बुधवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गडकरी यांचे भाषण सुरु होताच विदर्भवाद्यांनी घोषणा देत पत्रके सभास्थळी फेकली.

युवकांच्या घोषणाबाजीमुळे गडकरी संतापले आणि शांत बसत नसतील तर त्यांना ठोकून काढा, असे निर्देश गडकरींनी पोलिसांना दिले.

गडकरींच्या आदेशानंतर पोलिसांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यानी विदर्भवाद्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. असा आरोपही करण्यात आला आहे.

नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याचा आता सर्वत्र निषेध होत आहे.

गडकरी यांच्या भाषणावेळींच घोषणा का?

२०१४ मध्ये गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख कार्यक्रमादरम्यान फेकलेल्या पत्रकांमध्ये होता.

‘गडकरींनी २०१४ दिलेले आश्वासन पूर्ण करावे, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे’, अशा घोषणा यावेळी युवकांनी दिल्या आहेत. .

नितीन गडकरी व मुख्यमंत्री या पुढे जिथे जिथे जातील तिथे विदर्भवाद्यांनी विदर्भ केव्हा देता असा प्रश्न जाहीर सभेत विचारा असं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

आधी विदर्भ द्या, मग भाषण करा व विदर्भाच आश्वासन पूर्ण करा असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *