Mon. Jul 22nd, 2019

जर्मनीत परिचारकाने केली 300 रुग्णांची हत्या ?

0Shares

जर्मनीत एका परिचारकाने तब्बल ३०० रुग्णांची हत्या केली असल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ओल्डबर्ग शहरातील नील्स होगल या परिचारिकेने हे कृत्य केले असल्याची माहिती मिळाली आहे. होगलच्या विरोधात 2006 पासून खटला सुरू आहे. रुग्णांना औषधे आणि इंजेक्शन देऊन तो हत्या करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

ओल्डबर्ग शहरात नील्स होगल या परिचारकाने 300 रुग्णांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.

सुरूवातीला दोन रुग्णांच्या हत्येच्या प्रकरणी तो शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर  100  रुग्णांच्या हत्येप्रकरणी खटला सुरू आहे.

होगल रुग्णांना औषधे आणि इंजेक्शन देऊन त्यांना संपवत होता. असे स्पष्ट झाले आहे.

होगलने 45 रूग्णांना मारले असल्याचा कबुली दिल्याचेही सांगण्यात आलं आहे.

तो डेन्मनहॉर्स्ट येथील रुग्णालयातही काम करायचा तिथेही काही रुग्णांचा मृत्यू झाला होता.

होगल हा जर्मनीतील सर्वात मोठा सिरीयल किलर मानले जात आगे.

तो अशी हत्त्या करत असल्याचा संशय कधीच कोणाला आला नाही.  गुन्हेगारी हेतूने तो हे सगळं करत असल्याचं म्हटलं आहे.

या प्रकरणी कोर्ट जूनमध्ये निकाल जाहीर करणार आहे. त्याच्या  सोबतच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे,

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: