Wed. Jan 19th, 2022

‘कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता तोडगा काढा’ – नवनीत राणा

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारकडून अद्याप संपाबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. संपकारी एसटी कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर तोडगा काढा, असे खासदार नवनीत राणा यांना सांगितले आहे.

  राज्यात एसटीच्या विलीनीकरण मुद्यावरून संप सुरूच आहे. सरकारकडून या संपबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतप्त झाल्यात. त्यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परबांवर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू आहे, मात्र राज्य सरकार यावर तोडगा काढत नाही. याउलट संपकऱ्यांना संप मागे घेण्याबाबत सूचना करता आहेत. असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

  तसेच नवनीत राणा यांनी पुढील काही दिवस संप सुरूच ठेवण्याचे आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला तर राज्य सरकारला कर्मचाऱ्यांसमोर झुकावेच लागेल असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *