Tue. Oct 19th, 2021

भारतीयांचा युरोपात जाण्याचा मार्ग मोकळा

भारतीयांचा यूरोपात जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे . युरोपियन महासंघाने कोविशील्डला मान्यता दिली असून महासंघाबरोबरच स्वित्झर्लंड ने देखील कोविशील्डला मान्यता दिली. कोविशील्डला महासंघात मान्यता नसल्यामुळे भारतीयांचा यूरोपात जाण्याचा मार्ग रखडला होता.ग्रीन पासच्या युरोपियन महासंघाच्या भूमिकेमुळे भारताने भूमिका घेतली होती कि, जर लशीला मान्यता दिली नाही तर युरोपातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस विलगीकरण बंधनकारक करू. मात्र आता युरोपियन महासंघाने लशीला मान्यता दिली आहे. यात ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आयसलँड, आयर्नलँड, आणि स्पेन या सात देशांचा समावेशन होता. गुरुवारपासून ग्रीन पास देण्यात येणार आहे.

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस घेतलेल्यांचा ग्रीन पासमध्ये समावेश केल्यास प्रवासात मुभा मिळू शकते, शिवाय विलगीकरणाचा कालावधीही कमी होतो. भारताने युरोपीन महासंघातील २७ सदस्य राष्ट्रांनी पॉलिसीचा वापर करण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच कोविन पोर्टलच्या माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र स्वीकार करावे, अशी विनंती भारताने युरोपीन महासंघाला केली आहे. दरम्यान, युरोपीय वैद्यक संस्थेकडून कोविशिल्ड या लशीला महिनाभरात मान्यता मिळेल, असा विश्वास पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *