Wed. Jun 29th, 2022

युद्धभूमीतून औरंगाबादेत परतले सात विद्यार्थी

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम असून या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतत आहेत. अशातच, गुरुवारी युक्रेनमध्ये अडकलेले सात विद्यार्थी औरंगाबादमध्ये परतले आहेत. युद्धभूमीतून परतलेल्या विद्यार्थ्यांना पाहून पालकांचे अश्रू अनावर झाले.

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतत आहेत. दरम्यान, मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांना पाहून पालकांचे अश्रू अनावर झाले आहेत. गुरुवारी रात्री सात विद्यार्थी औरंगाबादमध्ये परतले आहेत. आपल्या पाल्यांना पाहिल्यानंतर पालकांना आंनदाश्रू आवरता आले नाहीत.

मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत

शुक्रवारी पहाटे रुमानियातील बुखारेस्ट येथून भारतीय विद्यार्थी मुंबई विमानतळावर पोहचले. यावेळी, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांना प्रवासातील अनुभव विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.