अलिबागमध्ये हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्ज रॅकेट उघड

अलिबागमध्ये एका हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्ज रॅकेटचा रायगड पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने पर्दाफाश केलाय.याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा देखील समावेश असल्याचे समजते. वेश्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची रवानगी कर्जतच्‍या सुधारगृहात करण्‍यात आली आहे.

हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्ज रॅकेट उघड

अलिबागमध्ये सेक्‍स आणि ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

श्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची रवानगी कर्जतच्‍या सुधारगृहात करण्‍यात आली आहे.

आरोपींकडे 26 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले आहे असून त्‍याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये आहे.

अलिबागमध्ये किनारपट्टी भागात बर्थडे पार्टीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत आहे. अशी माहीती पोलीसांना मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने किनारपट्टी भागावर छापा टाकला आहे. यामध्ये हे रॅकेट उघडकीस आले आहे.

पोलीसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे, तर राखी व रंजिता यांच्याकडे अनुक्रमे 15 व 11 ग्राम असे 26 ग्राम कोकेन हे अमली पदार्थ आढळले.

स्थानिक गुन्हे पथकाने आज आरोपी व पीडित महिलांना ताब्यात घेऊन अटक केली.

 

Exit mobile version