Jaimaharashtra news

प्रेमासाठी केलं लिंग परिवर्तन, मात्र नंतर घडलं असं काही…

इंदूरमध्ये प्रेमासाठी लिंग परिवर्तन (Sex change operation) केलेल्या व्यक्तीवर डिप्रेशनमुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मूळच्या रोहित नामक तरुणाने एका पुरुषावरील प्रेमासाठी लिंगपरिवर्तन करून स्वतःला तरुणी बनवून घेतलं. मात्र त्यानंतरही आयुष्यात सुख आलं नाहीच.

काय म्हणाले पोलीस?

हरीश नावाच्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत रोहित लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहत होता.

4 महिन्यांपूर्वी रोहितने स्वतःवर लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेतली

या शस्त्रक्रियेनंतर रोहित स्त्री बनला आणि ‘पलक’ नावाने आपल्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) लग्न करून राहू लागली.

मात्र लिंगबदल केल्यावर पलकला शारीरिक त्रास होऊ लागला.

लघवीच्या त्रासाने पलक हैराण झाली.

या वेदना तिला असह्य होऊ लागला.

यातून नैराश्यग्रस्त झालेल्या पलकने लिंग परिवर्तनानंतर अवघ्या 4 महिन्यांत गळफास लावून आत्महत्या केली.

पलकचं शव पोस्ट मॉर्टमसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आलं. इंदूर पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.  

Exit mobile version