Sat. Feb 29th, 2020

कर्णबधिर मुलींवर, केअर टेकरकडून लैंगिक अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

रायगड जिल्ह्यात दोन कर्णबधिर मुलींवरती केअर टेकर कडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलीय.

कर्जतमधल्या जीवन शिक्षण मंदिर शाळेत भरणाऱ्या एका निवासी कर्णबधिर शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राम शंकर बेंबरे असं या आरोपीचं नाव आहे.

सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार-रविवारी पालक आपल्या पाल्याला घरी घेऊन जातात. नेरळ येथील एक मुलगी या शाळेत शिक्षण घेत आहे. त्या मुलीला 28 मार्च रोजी सुट्टी असल्याने तिची आई तिला घरी घेऊन आली. त्यावेळी त्या पीडित मुलीने, खाणाखुणा करत आपल्याला त्रास होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आईला आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीवरतीही अत्याचार झाल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *