Fri. Aug 6th, 2021

कल्याण मध्ये भोंदूबाबा, गुफेत करायचा अनैसर्गिक लैगिंक शोषण

देशात किती भोंदूबाबा पकडले गेले. मात्र अजूनही भोंदूबाबांचा कारनामा संपत नाही. कल्याण नजीकच्या टिटवाळा शहरात लालजी सिंग उर्फ मंजू माताजी या बाबाच्या भोंदूगिरीचा कारनामा उघड झाला आहे. लोकांवर जादूटोणा, करणी आणि उतारा करण्याच्या नावाखाली हा बाबा चक्क भक्तांकडून आपली लैगिंक भूक भागवून घेत होता. तर कधी भक्तांचे लैगिंक शोषण करीत होता. या अजब लैगिंक बाबाविरोधात टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बाबा पसार झाला आहे. त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

कल्याण पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या टिटवाळा शहारात वैष्णव देवीचे मंदीर आहे.
या मंदिराचा मुख्य पुजारी  लालसिंग उर्फ मंजूमाताजी असून तो हे कृत्य करत होता.
मंजूमाताजी बाबा हा मंदिरात बस्तान बांधून जादूटोणा करीत होता.
सफरचंदातून काढायचे शिक्के काढणे,काजू बदाम वरती उधरन काढणे असे प्रकार तो करत होता.
 उतारा शोधतो असे सांगून भक्तांचे कपडे काढून त्यांच्यासोबत अनैसर्गिक संभोग करायचा.
गेल्या 20 वर्षापासून या चार सेवकांचे लैगिंक शोषण सुरु होते. काही वर्षापासून हे सेवक बाबापासून दूर झाले.
त्यांनी आत्ता त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराची कहाणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे सांगितली.
पोलिसांनी चार सेवकांच्याच्या तक्रारीच्या आधारे मंजूमाताजी या भोगीबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अशी होती गुफा

या बाबाजीचे वास्तव्यास  गुफेत असायचे म्हणून  पोलीसांनी या गुफेकडे धाव घेतली.
त्याठिकाणी आलीशान बेडरुम, किचन, बाथरुम तसेच साधना कक्षाच्या नावाखाली गुफा तयार केली आहे.
भोगाची सामग्री त्याठिकाणी आढळून आली. हे सगळं बघून बाबा थक्क झाले.
विविध कंपन्यांचे श्ॉम्पू, लोशन, व्हॅसलीन, जादू टोण्यासाठी लागणारे काळे उडीद, लाल पुस्तक असे साहित्य त्या ठिकाणी होते.
पोलीसांनी  त्याठिकाणी मिळून आलेले साहित्य जप्त केले आहे. त्याचा पंचनामा केला आहे.
 बाबाने या चार तरुणांप्रमाणोच असंख्य भक्तांच्या भक्तीचा फायदा घेत लैगिंक शोषण केले आहे.
त्यात काही महिलांचा समावेश असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *