Sat. Sep 21st, 2019

अमरावतीमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न

3 वर्षीय चिमुकलीवर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. याप्रकरणी गावातील तरुणाला अटक करण्यात आली आहे.

0Shares

3 वर्षीय चिमुकलीवर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. याप्रकरणी गावातील तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये खडकपुरा शेतशिवारात ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नेमकं प्रकरण का?

अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर येथील ही 3  वर्षीय चिमुकली आईसोबत चांदुर शहरात आली होती. गावातील एका तरुणाने यांच्याशी बातचीत करीत 3 वर्षीय चिमुकलीला तिच्या वडिलांचा शोध घेतो या बहाण्याने खडकपुरा शिवारात नेले.

या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना काही युवकास दिसल्याने आरोपीने पळ काढला. चिमुकलीने सर्व हकीकत तिच्या आईकडे सांगितल्यानंतर चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी किरण वऱ्हाडेचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहे.

अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणात मुलगी चांगलीच भायभीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *