Wed. Oct 27th, 2021

पुण्यात शिक्षकाकडूनच तब्बल 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील लोहगाव परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने तब्बल 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबल उडाली आहे. यामुळे मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मुलींना आरोपी एका खोलीत डांबून ठेवून त्यांनी दमदाटी करत असल्याने हा प्रकार कुणाच्या लक्षात आलेला नाही. शालेय मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील लोहगाव परिसरात तब्बल 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत.

लोहगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी त्याच पदवीधर शिक्षक असून त्याचे नाव विक्रम पोतदार असे नाव आहे.

मागील सहा महिन्याच्या कालावधीत शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलींना एका खोलीत घेऊन दम द्यायचा.

त्या मुलींना कोणाला सांगायचं नाही असं खडसवून सांगत होता.

असे दमदाटी करुन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

या सहा महिन्यात तब्बल 12 मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली.

या घटने बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर शाळेतील इतर मुलीकडे देखील चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *