शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

मनसेचं राज्यव्यापी अधिवेशन मुंबईतील गोरेगावात सुरु आहे. या अधिवेशनात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना लॉंच करण्यात आले.
अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी वर्णी झाली आहे. याबाबतची घोषणा बाळा नांदगावकर यांनी केली. मनसेच्या नव्या झेंड्याचं देखील या अधिवेशनात अनावरण करण्यात आलं.

दरम्यान या अधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली.

या शॅडो कॅबिनेट मधून महाविकास आघाडीच्या प्रत्येक मंत्र्यावर लक्ष देण्यात येणार आहे.

विरोधकांच मंत्रिमंडळ म्हणजेच ‘शॅडो कॅबिनेट’ होय.

