Wed. Jun 29th, 2022

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर शनिवारी रात्री अविश्वास प्रस्ताव संमत झाला असून मुस्लिम लीग नवाज गटाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा अविश्वास प्रस्ताव संमत झाला असून पाकमध्ये सत्तांतर झाले आहे. पाकच्या पतंप्रधानपदी नवाज शरीफ यांचे लहान भाऊ शहाबाज शरीफ विराजमान झाले आहेत. पाकच्या संसदेत शाहबाज शरीफ यांना १७४ मतं पडली असून विजय मिळवला आहे.

पाकिस्तानच्या संसदेत एकूण ३४२ खासदारांपैकी इमरान खान यांना बहुमतासाठी १७२ मतांची गरज होती. मात्र अविश्वास प्रस्तावामध्ये इमरान खान यांच्या विरोधात १७४ मतं पडली. यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पदभार सांभाळणार आहेत.

कोण आहेत शाहबाज शरीफ?

शहाबाज शरीफ हे सध्याचे पाकिस्तान संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाचे ते अध्यक्ष असून नवाज शरीफ यांचे ते लहान भाऊ आहेत. ते तीन वेळा पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले असून २०१८ साली पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी ते उभे राहिले होते. १९८८ सालापासून शहाबाज पाकिस्तानी राजकारणात सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांच्यावर पैशांच्या अफरातफरी केल्याचेही आरोप आहेत.

पाकिस्तानात कोणतेही सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करत नाही, असा इतिहास असताना आता संसदेत इमरान खान यांचा अविश्वास ठराव मंजूर झाला असून पाकच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची नियुक्ती झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.