Sun. May 16th, 2021

हुतात्मा राजगुरू यांना ‘बलिदान दिना’निमित्त अभिवादन!

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा ‘बलिदान दिन’ आज राजगुरुनगर येथील त्यांच्या जन्मस्थळावर साजरा होत आहे. या निमित्ताने देशभरातून विविध क्षेत्रातील लोक, राजगुरू यांचे नातेवाईक राजगुरूंना अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

राजगुरू यांचं क्रांतीकार्य

शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म 1909 मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला.

ते वाराणसी येथे संस्कृत आणि धर्मशास्त्राचं शिक्षण घेत होते.

क्रांतीवीरांच्या संपर्कात आल्यावर ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी’चे सभासद बनले.

चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव या क्रांतीवीरांशी त्यांचा येथे परिचय झाला.

लाहोर, अमृतसर, कानपूर, आग्रा अशा उत्तर भारतातील अनेक शहरांत त्यांनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठवण्यासाठी जनजागृती केली.

ज्येष्ठ नेते लाला लजपतराय यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सॅण्डहर्स्ट या ब्रिटीश अधिकाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली.

30 डिसेंबर 1929 रोजी पुण्यात त्यांना पकडण्यात आलं.

लाहोर कटातील सहभागाबद्दल त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला.

अखेर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव यांच्यासोबत राजगुरू शूरपणे फासावर चढले.

राजगुरू वाड्यावर बलिदान दिन’!

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचा ८८ वा बलिदान दिवस आहे.

हा बलिदान दिवस आज त्यांच्या वाड्यावर साजरा होतोय.

या निमित्ताने सकाळी पुणे, नाशिक महामार्गावरील भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

देशभरातून विविध क्षेत्रातील लोक या जन्म स्थळाला भेट देतात

विविध गावांतुन मशाली घेऊन राजगुरुप्रेमी तरुण ‘राजगुरु वाड्या’वर दाखल होतात.

सकाळी शहरातील सुमारे 70 पेक्षा जास्त रिक्षांची मिरवणूक काढण्यात आली.

हुतात्मा राजगुरु प्रतिष्ठानच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.

 

सरकारकडून अपेक्षा

राजगुरूंच्या कुटुंबियांनी हा वाडा राज्य सरकारला देऊ केला आहे.

या ठिकाणी सरकारच्या वतीने विविध कामंही सुरू आहेत.

मात्र ही कामं अतिशय संथ गतीने सुरू आहेत.

ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून राजगुरूंचं स्मारक करावं अशी मागणी त्यांचे नातेवाईक करत आहे

तसंच पंजाब सरकार ज्या पध्दतीने भगतसिंग यांची जयंती आणि बलिदान दिन साजरा करतं, तशाच पध्दतीने राजगुरूंचेही हे दोन्ही दिवस महाराष्ट्र सरकारने साजरे करावे अशी अपेक्षा राजगुरू यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *