Sat. Jul 2nd, 2022

पवित्र रिश्ता मालिकेत मानवची भूमिका साकारणार “हा” अभिनेता

‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेने एकेकाळी घराघरात पोहचून प्रेक्षकांचे मनं जिंकली होती. या मालिकेतील अर्चना(अंकिता लोखंडे) व मानव(सुशांत सिंग राजपूत) या जोडीला प्रेक्षकांची खूपच जास्त पसंती मिळाली होती. म्हणूनच या मालिकेने तब्बल 5 वर्ष टेलिव्हिजन वर राज्य केले. मात्र आता ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या नवीन सीझन मध्ये थोडा बदल होणार आहे.

गेल्या वर्षी सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याचे निधन झाल्यानंतर पवित्र रिश्ता मालिकेची सर्वांनी आठवण काढली. कारण सुशांतच्या अभिनयाची सुरुवात ‘किस देस मे है मेरा दिल’ या मालिकेपासून झाली होती. मात्र त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांत हा मुख्य भूमिकेत झळकला होता.पवित्र रिश्ता या मालिकेचे दुसरे सिझन सुरू करण्याची मागणी ही प्रेक्षकांनी केली आहे. त्यामुळे एकता कपूर ही नवीन कलाकारासह नवीन कथा घेवून येणार आहे.

पवित्र रिश्ता मालिकेच्या नवीन सीझन मध्ये अर्चनाच्या भूमिकेत अंकिता लोखंडे हीच असून मानवची भूमिका शाहीर शेख हा अभिनेता साकारणार असल्याचे समजतंय. शाहीर शेख हा मानवची भूमिका साकारत असल्याने सुशांत सिंगचे फॅन्स मात्र नाराज झाले आहेत. त्यामुळे आत्ता पासूनच या मालिकेचा विरोध होताना दिसून येत आहे.

सुशांतच्या निधनाचा गैरफायदा घेऊन नवीन मालिका बनवीत असल्याचा राग सुशांतचे फॅन्स व्यक्त करताना दिसून येत आहेत. मानव हे पात्र फक्त सुशांत साठीच होते, त्यामुळे त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही, असे सुशांतच्या फॅन्सचे म्हणणे आहे. तर शाहीर ने यापूर्वी नाव्या, महाभारत, कूछ रंग प्यार के ऐसे भी अशा काही मालिकांमध्ये काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.