Fri. Oct 7th, 2022

शाहिदने शेअर केला मुलाचा पहिला फोटो…

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर हा सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो.

शाहिद आपली मुलगी मीशाचा फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करतो.

यावेळी त्यानं प्रथमच आपल्या सहा महिन्यांचा मुलगा जैन कपूर सोबत एक फोटो शेअर केला आहे.

त्यानं शेअर केलेल्या फोटोला तब्बल 13 लाख लोकांनी लाईक केलं आहे.

असा आहे जैनचा पहिला फोटो

शाहिदनं 2015 मध्ये आपली कॉलेज मैत्रीण मीरा राजपूतसोबत विवाह केला होता.

मीरानं 26 ऑगस्ट 2016 ला मीशाला जन्म दिला.

तिनं मीशा हे नाव मीरा आणि शाहिद या त्यांच्या पहिल्या अक्षरापासून तयार केलं आहे.

मागील वर्षी 5 सप्टेंबरला मीरानं दुसऱ्या मुलाला जन्म दिला.त्याचं नाव त्यांनी जैन ठेवलं.

शाहिद कपूर हा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो.तो आपल्या मुलीचे फोटो नेहमीच शेअर करतो.

पहिल्यांदाच त्यानं आपल्या 6 महिन्यांचा मुलगा जैन कपूर साबत एक फोटो शेअर केला आहे.

त्यांच्या या फोटोला तब्बल 13 लाख जणांनी लाईक केलं.आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन जैन सोबतच्या फोटोला ‘द सन’ असं कॅप्शन दिलं आहे.

वडिलांनी प्रेमानं उचलून घेतलेला जैन आपल्या डॅडींकडे बोलक्या नजरेनं पाहत असून त्याचे दोन्ही हात शाहिदच्या गालावर आहेत.असा आकर्षक फोटो शाहिदने शेअर केला आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.