Tue. Jun 18th, 2019

किंग खानच्या ‘झिरो’ ट्रेलरने मोडला रेकाॅर्ड

0Shares

प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने त्याच्या वाढदिवशी म्हणजेच 2 आॅक्टोबरला आगामी चित्रपट झिरो’चा ट्रेलर लाॅन्च केला होता.

फार कमी वेळात या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता पर्यत या ट्रेलरला 5.4 कोटी लोकांनी पाहिला आहे. देशात 24 तासांत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ट्रेलरमध्येही याचा समावेश झाला आहे. सोशल मीडियावर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’, ‘संजू’ आणि ‘बाहुबली 2’ सारख्या चित्रपटांनाही झिरोने मागे टाकले आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहिला असता शाहरुखची एंट्री लाजवाब आहे असे बोलणे चुकीचे ठरणार नाही.

अंपगत्व असताना देखील आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायला शिकवणारा चित्रपट असल्याचे ट्रेलर पाहून समजत आहे.या चित्रपटात शाहरुखने बुटक्या माणसाची भूमिका साकरली आहे.

ट्रेलरमध्ये अनुष्काची छोटीशी झलक पाहायला मिळाली असली तरी तिच्या अभिनयाचे सर्व स्थरांवरुन कौतुक होत आहे. तसेच हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार असून चाहत्यांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *