Sun. May 16th, 2021

तामिळ सिनेमात शाहरुख खान ‘खलनायक’, ‘हा’ स्टार असेल हिरो!

शाहरूखच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’या हिंदी सिनेमामध्ये त्याची दाक्षिणात्य भाषेशी जवळीक आपण पाहिली. आता तो शाहरुख तामिळ सिनेमात काम करणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील तरुण दिग्दर्शक ‘अटली’ याच्या आगामी  ‘थलपति 63’ या सिनेमामध्ये शाहरूख खलनायकाच्या रोलमध्ये दिसणार आहे. जेमतेम पंधरा मिनिटांच्या या रोलमध्ये शाहरुख क्लायमॅक्सलाच एंट्री करणार आहे. तामिळ सुपरस्टार ‘इलयाथलपती’ विजय याच्याशी शाहरूखची जुगलबंदी रंगणार आहे. शाहरूखसोबत आणखी एक सिनेमा करण्याचीही इच्छा अटलीने व्य़क्त केली आहे.

शाहरुखचं ‘चेन्नई कनेक्शन’!

शाहरुख खानचा बॉलिवूडमधला जलवा सध्या कमी होताना दिसत आहे.

गेल्या काही काळापासून त्याच्या सिनेमांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीय.

अशावेळी शाहरुखने दक्षिणेचा मार्ग धरला आहे.

शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग असला, तरी तामिळ सिनेमा त्याच्यासाठी नवा नाही.

अनेक वर्षांपूर्वी शाहरुख खानने कमल हासनसोबत हे राम या सिनेमात कमल हासनच्या पठाण मित्राची भूमिका साकारली होती.

‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमातही त्याने तामिळ कलाकारांसोबत तामिळ स्टाईलची फिल्मी धम्माल केली होती.

‘रा.वन’ या आपल्या सिनेमात तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी पाहुणे कलाकार म्हणून भूमिका करावी, यासाठी शाहरुख अनेक महिने थांबला होता.

खलनायकी भूमिकांनी बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड सेट करणारा शाहरूख तामिळ सिनेमातदेखील खलनायकच साकारणार आहे.

दिग्दर्शक अटलीच्या ‘थलपती 63’ या सिनेमात शाहरुख खान साऊथचा सुपरस्टार विजय यांच्यासोबत दिसणार आहे.

विजयसोबत शाहरुखची जुगलबंदी

विजय हा तामिळ जनतेमध्ये रजनीकांतनंतरचा सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार मानला जातो.

त्याच्या नावामागे ‘थलपती’ म्हणजे जनतेचा राजा असं बिरूद लावलं जातं.

‘राऊडी राठोड’ सिनेमातील ‘चिंताता चिता चिता’ या गाण्यात अक्षय कुमार आणि प्रभूदेवा यांच्यासोबत एक डान्स स्टेप करण्यापुरता विजय बॉलिवूडमध्ये डोकावला होता.

दिग्दर्शक अटलीसोबत विजयने ‘थेरी’, ‘मेरसेल’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे केले आहेत.

‘मेरसेल’ सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचाही अटलीचा मानस आहे. या सिनेमात विजयने साकारलेली मध्यवर्ती भूमिका शाहरुख खानने साकारावी यासाठी अटली प्रयत्नशील आहे.

‘विक्रम वेताळ’ची पारंपरिक लोककथा डार्क क्राईम ड्रामाच्या रूपात मांडणाऱ्या  तामिळमधील ‘विक्रम वेधा’ या सिनेमाचा हिंदी रिमेकही शाहरुख खान करणार होता. मात्र यातील Encounter Specialist विक्रमची  आर. माधवनने साकारलेली व्यक्तिरेखा शाहरुख साकरणार की Gangster वेधा (वेताळ)ची विजय सेतुपतीने साकारलेली भूमिका शाहरुख करणार याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. त्यावेळीही आपल्या टिपीकल गाजलेल्या खलनायकी भूमिकांच्या प्रेमापोटी ‘वेधा’ची भूमिका करायचं शाहरुखने ठरवलं. मात्र हा सिनेमा सुरूच होऊ शकला नव्हता.

आता ‘मेरसेल’चा रिमेक कधी येणार याबद्दल कल्पना नसली, तरी ‘थलपती 63’ मध्ये बॉलिवूड आणि कॉलिवूडचे सुपरस्टार स्क्रीनवर एकमेकांशी झुंजणार आहेत. ही जुगलबंदी कशी रंगणार हे पाहणं देशभरातल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *