Sat. Jun 12th, 2021

‘बाहुबली’ हून भव्य चित्रपट साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली 

 

भारताचा इतिहास ‘महाभारत’ या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठीचा खर्च मोठा असतो, हा खर्च माझ्या बजेटमध्ये नाही. त्यामुळे मी हा चित्रपट एखाद्या इंटरनॅशनल दिगदर्शकासोबत बनविणार असल्याची इच्छा शाहरुखने व्यक्त केली आहे. महाभारत हा चित्रपट ‘बाहुबली’ चित्रपटाच्या बरोबरीचा व्हायला हवा, असेही तो यावेळी म्हणाला.

 

शाहरुखची ही इच्छा ‘बाहुबली’ चे दिगदर्शक एसएस राजामौली पूर्ण करणार आहेत. शाहरूखसोबत ‘महाभारत’ चित्रपट करण्याचे त्यांनी घोषित केले आहे.

 

बॉलीवुडचा किंग खान शाहरुख आपल्या चित्रपटातून नेहमी नवीन भूमिका साकारत असतो. त्याने अनेक ऐतिहासिक चित्रपटातही काम केले आहे. सम्राट अशोकच्या जीवनपटावर आधारित ‘अशोका’ चित्रपटात शाहरुखने उत्तम काम केले आहे. आपल्या कामामुळे तो नेहमीच चर्चेत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *