Fri. Sep 30th, 2022

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “यांच्या एवढा खोटारडा माणूस मी पाहिला नाही, सतत खोटं बोलत राहतात, युती असताना अमित शाहांना फोन करत होते. उद्धव ठाकरे हे जगातले ढ माणूस आहेत”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांना अमित शहा यांचा दौरा एवढा का झोंबला, अमित शाहा हे देशाचे गृहमंत्री ते देशभरात कुठेही जाऊ शकतात, उद्या महापालिका निवडणुका लागल्या, तर तिथेही ते येऊ शकतात. तुम्हाला झोंबायचे कारण काय?”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

‘अमित शाहा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांना जमिन दाखवा असे म्हणले होते. पण अमित शाहांचा बोलण्याचा अर्थ यांना कळला नाही. त्यांना जमिनीवर या असे म्हणायचे होते. आता म्हणताहेत आसमान दाखवू. कोणाच्या जीवावर आसमान दाखवू बोलत आहात उद्धव ठाकरे. शिवसेनेचा जन्म झाला १९ जून १९६६ तेव्हा तुम्ही ६ वर्षांचे होता. तेव्हा तुम्ही कुठेच नव्हता. तुम्ही ३९ व्या वयात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा तुम्ही राजकारणात आलात. त्याच्याआधी तुम्ही शिवसेनेत सक्रिय नव्हते. बरीच आंदोलने झाली तेव्हा तुम्ही कुठे होता. आतापर्यंत कोणाच्या कानशिलात लगावली”, असे नारायण राणे यांनी म्हटले.

2 thoughts on “‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.