Jaimaharashtra news

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

शक्ती मिल बलात्कार प्रकरणी न्यायालयाने आरोपींच्या शिक्षेत बदल केला आहे. मुंबई न्यायालयाने शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र आता ही शिक्षा न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. शक्ती मिल बलात्कार प्रकरणी आरोपींची फाशीची शिक्षा न्यायालयाने जन्मठेपेत बदलली असल्याचा निर्णय न्या. साधना जाधव आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

२०१३मध्ये घडलेले शक्ती मिल बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा म्हणून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी सर्वत्र करण्यात येत होती. या प्रकरणातील आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली आणि सलिम अंसारी यांना न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता या शिक्षेत न्यायालयाकडून बदल करण्यात आला आहे. न्यायलायने फाशीची शिक्षा रद्द करत ती जन्मठेपेत बदलली आहे.

Exit mobile version