Wed. May 22nd, 2019

शरद पवारांची मुंबईतल्या पूल दुर्घटनेवर टीका

48Shares

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली आणि दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार यांना मवाळमधून उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. यावेळी शरद पवार यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.

काय म्हणाले शरद पवार ?

शरद पवार यांनी मुंबईत झालेल्या पूलदुर्घटनेवरून टीका केली आहे.

रेल्वे स्थानकापासून सर्व सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.

रेल्वेने दररोज ११ ते १५ अपघात होतात.

बुलेट ट्रेनवर सव्वा कोटी लाख खर्च केला आहे.

तसेच काटोलची पोटनिवडणूक न घेता सर्व पक्षांनी मिळून उमेदवार ठरवावा असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *