Tue. Mar 31st, 2020

एल्गार आणि कोरेगाव-भीमा दंगलीचा स्वतंत्र तपास व्हावा- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीसंदर्भात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं.

एल्गारमध्ये हजर नसलेल्यांवर गुन्हा दाखल झाला असल्याचं पवार यांनी म्हटलंय. एल्गार परिषद आणि भीमा- कोरेगाव दंगल यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं विधान पवार यांनी केलं.

काय म्हणाले पवार?

भीमा – कोरेगावला जाणाऱ्यांची संख्या वाढली, भीमा- कोरेगावमध्ये संभाजी भिडे यांनी वेगळं वातावरण तयार केलं. कोरेगाव भीमा, एल्गार संदर्भात चर्चा होतेय. त्यात उलटसुलट चर्चा होत आहे. कोरेगाव भीमा हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्तंभाला अभिवादन त्या ठिकाणी केलं जातं.

आजूबाजूच्या गावांमध्ये संभाजी भिडे आणि काही जणांनी वेगळं वातावरण निर्माण केलं.

संभाजी महाराजांची समाधी उद्ध्वस्त करण्यात आली. त्याचा परिणाम संघर्षात झाला.

त्यामागे काय वस्तूस्थिती आहे, ते आज ना उद्या बाहेर येईल

एल्गार परिषद ही वेगळी आहे. कोरेगाव भीमाशी तिचा संबंध नव्हता.

एल्गार परिषद त्याच्या काही दिवस आधी झाली होती.

शंभरपेक्षा जास्त संघटना परिषदेत सहभागी झाल्या होत्या.

अध्यक्षपद निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत करणार होते. परंतु ते येऊ शकले नाहीत.

एल्गार परिषदेशी संबंध नसलेल्या, हजर नसलेल्या लोकांवर खटले भरले गेले.

या लोकांवरच्या अन्यायातून कशी सुटका करायची याचा माझा प्रयत्न आहे

भीमा- कोरेगाव स्वतंत्र चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल व आज जे तुरुंगात आहेत ते बाहेर येतील व जे बाहेर आहेत ते आत जातील.

ज्या दिवशी एनआयए ने हा तपास आपल्या हाती घेतला त्याच दिवशी आमची सकाळी बैठक झाली होती, आम्ही काय केंद्राकडे चौकशीची मागणी केली नव्हती मग या चौकशीची गरज काय? केंद्र सरकारचा अधिकार आहे, पण त्या मध्ये आम्ही एनआयए  कलम 10 प्रमाणे समांतर चौकशी करू शकतो, माझी मागणी एल्गार परिषदेची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात यावी ही आहे

पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करून लोकांवर गुन्हे दाखल केले, 15 ते 20 वर्षं मी गृहखात्याचं काम केले आहे पण आज ज्या पद्धतीने गैर वापर होत आहे ते पाहून दुःख होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *