Sun. Sep 19th, 2021

शरद पवार आमचे अमिताभ बच्चन- जितेंद्र आव्हाड

“शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन असून वयाच्या ऐंशीव्या वर्षीही तरुणाईला भुरळ घालत फिरत आहे” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यामध्ये केलंय.

“पवारांचा मी वारकरी”

मी पवारांचा वारकर आहे.

गेली अनेक वर्षं पवार आहेत तिथे आहेत.

ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहेत, असं विधान आव्हाड यांनी केलं.

पंतप्रदान मोदी यांनी नाशिकमध्ये पाकिस्तानप्रेमावरून पवारांवर केलेल्या आरोपांवरही आव्हाड यांनी टीका केली आहे.

मोदींना पाकिस्तानचा कांदा चालतो, साखर चालते, नवाज शरीफ यांना मिठया मारलेल्या चालतात, त्यांच्या घरी जाऊन बिर्याणी खाल्लेली चालते. मात्र इथे येऊन पाकिस्तानवर टीका करायची, पाकिस्तानप्रेमावरून कोणावर तरी टीका करायची, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

पुढे बोलताना मोदी बाकी मंदीवर बोलत नाहीत, शेतीमाल भावावर बोलत नाहीत यावर आव्हाड यांनी आक्षेप घेतला.

राज्याच्या निवडणुकीत इथलं बोला अशी सूचना करत मोदींना कोल्हापूर, सांगली येथील पूरसंकट दिसलं नाही असं म्हणत पंतप्रधानांवर त्यांनी टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *