Tue. Jul 14th, 2020

अरुण जेटली यांचं जाणं देशासाठी मोठा आघात – शरद पवार

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन झालं आहे. आज दुपारी 12.07 वाजता एम्स रुग्णालयात जेटली यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे. 

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन झालं आहे. आज दुपारी 12.07 वाजता एम्स रुग्णालयात जेटली यांनी घेतला अखेरचा श्वास 9 ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी ट्विट् करत शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अरुण जेटलींना श्रद्धांजली

अरुण जेटली हे एक उत्तम वकील म्हणून लौकिक होताच संसदपटू, प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेलं काम लक्षात राहण्यासारखं आहे. केंद्रात अर्थमंत्री पदासह सरंक्षण व अन्य विभागाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यातून ते उत्तम प्रशासक आहेत याची प्रचिती देशाला आली.

विद्यार्थी चळवळीपासून त्यांनी आपल्या आयुष्याचा महत्वाचा काळ दिला. क्रीडा क्षेत्रातही त्यांना रस होता. खेळाबद्दल आस्था होती. कला, संगीत अशा विविध क्षेत्रात समरस होणारं नेतृत्व म्हणून आम्ही पाहिलं.

त्यांनी बारामतीत केलेला दौरा आणि इथल्या कामांची केलेली स्तुती लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्याबद्दल सदभावना कायम मनात राहणारी आहे. एका सहकारी मित्राला मुकावं लागलंय. या शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *