Sat. May 25th, 2019

मी पाहिलं,घड्याळाचं बटण दाबलं की कमळाला मत जातं – शरद पवार

0Shares

घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं आहे असा दावा राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केला आहे. निवडणुका सुरू असल्यापासून कित्येकवेळेला ईव्हीएम मशीनबाबत शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात देखील शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत चिंता व्यक्त केली आहे. 23 मे रोजी निवडणुकांचा लोकसभा निकाल लागणार आहे. आणि शरद पवारांनी असं वक्तव्य केल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं आहे

हैदराबाद आणि गुजरातमध्ये काही ईव्हीएम मशीन लोकांनी माझ्यासमोर ठेवून असा प्रकार समोर आणला आहे.

सगळ्याच ईव्हीएम मशीनमध्ये असा बिघाड आहे असं माझं म्हणणं नाही.

हा सगळा प्रकार आम्ही कोर्टासमोरही आणला होता मात्र आमचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं नाही.

आम्ही VVPAT मशीमधल्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती.

परंतु  यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जात होत्या.

या मोजल्या जाणाऱ्या चिठ्ठ्यांचा आकार देखील त्या चिठ्ठ्यांपेक्षा मोठ्या होत्या.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. .

मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी म्हणणं चुकीचं आहे.

एखादा माणूस हयात नसताना त्याबद्दल अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. अशा शब्दात त्यांनी मोदींना लक्ष केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *