५६ इंचाची छाती असेल तर कुलभूषण जाधव यांना का सोडवून आणत नाही ? – शरद पवार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी कराडमध्ये झालेल्या महाआघाडीच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाती ५६ इंचाची असेल तर कुलभूषण जाधव यांना का सोडवून आणत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांनी अनेक प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. महायुतीचा महामेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५६ पक्षांच्या विश्वासावर देश चालत नाही. त्यासाठी ५६ इंचाची छाती लागते असे म्हटलं होतं.
काय म्हणाले शरद पवार ?
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथील महाआघाडीत भाजपा सरकारवर आणि मोदींवर हल्ला केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाती खरंच ५६ इंचाची असेल तर कुलभूषण जाधव यांनी सोडवून का आणत नाही असे शरद पवार म्हणाले.
मोदी राफेलच्या चौकशीला का घाबरत असल्याचे शरद पवार यांनी विचारले.
तसेच भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचा आणि जवानांच्या पराक्रमाचा फायदा घेणाऱ्यांना जनता आगामी निवडणुकांत त्यांची जागा त्यांना दाखवेल असेही त्यांनी म्हटलं आहे.
मोदींनी राफेलची खरेदी किंमत वाढवून फसवणूक केली आहे. तसेच भाजपा राफेलचा हिशोब द्यायला का घाबरत आहे असे प्रश्न शरद पवार यांनी विचारले.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी नसणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.