मोदींना उठता बसता मीच दिसतो – शरद पवार

ज्या पद्धतीने मोघलांना संताजी धनाजी दिसायचे त्याचपद्धतीने नरेंद्र मोदींना उठता बसता शरद पवार दिसत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवारांवर होणाऱ्या टिकेवर त्यानी शेलक्या भाषेत प्रत्युत्तर दिले. तर दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्याऐवजी आपल्या घरात कुटुंब आहे का? ते मोदींनी पहावे अशा शब्दात पवार कुटुंबियांवर होणाऱ्या टीकेला त्यानी उत्तर दिलंय. कोल्हापुरात खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार ?

पंतप्रधान दर दोन तीन दिवसांनी महाराष्ट्रात प्रत्येक सभेत माझ्यावर बोलले आहेत,याचा अर्थ आपले बर चाललंय असं दिसतय.

ज्या पद्धतीने मोघलांना संताजी धनाजी दिसायचे त्याचपद्धतीने नरेंद्र मोदींना उठता बसता शरद पवार दिसत आहेत.

दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्याऐवजी आपल्या घरात कुटुंब आहे का? ते मोदींनी पहावे.

मोदींच्या काश्मीर विकासाच्या मुद्द्याचे काश्मीर मध्ये स्वागत झाले. मात्र चार वर्षात विकास न झाल्याने तरुण संतप्त आहेत.

राजीनाम्याची धमकी देणारे आणि सरकारला चोर म्हणणारे उद्धव ठाकरे भरकटले आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारी यंत्रणांचा वापर करून गुन्हे दाखल करून प्रेशर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असा निशाणा त्यांनी चंद्रकांत पाटलांवर साधला आहे.

Exit mobile version