Sun. May 16th, 2021

आता फक्त संघाची हाफ चड्डी घालू नका – शरद पवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते एकमेकांवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूजच्या सभेनंतर शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यावर नातेपुते येथे वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. आता फक्त संघाची हाफ चड्डी घालू नका नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल अशा शब्दात सडकुन टिका केली. शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला नातेपुते येथील सभेत निशाणा साधला आहे. याच शब्दात त्यांनी रणजीतसिंह मोहीते पाटलांवरही टीका केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते एकमेकांवर टीका करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूजच्या सभेनंतर शरद पवार यांनी नातेपुते येथे सभा घेतली.

शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यावर नातेपुते येथे वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे.

आता फक्त संघाची हाफ चड्डी घालू नका नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल अशी टीका त्यांनी केली आहे.

अकलुजमधील गल्लीबोळातला दहशतवाद संपवण्यासाठी मी येथे आमदाराप्रमाणे काम करेन असा शब्द पवारांनी दिला.

रणजितसिंहच्या जिल्ह्यातून तक्रारी येत असल्याने लोकसभेला त्याला नाकारण्यात आलं.

रणजितसिंह कधी मुख्यमंत्री तर कधी गिरीश महाजन यांच्या घरासमोर तासंतास उभा राहु लागल्याने त्याला नाकारलं.

इतकी वर्षे सत्ता दिली त्यावेळी कृष्णा भिमा स्थिरीकरणाबाबत विचार यांच्या डोक्यात कसा आला नाही.असा सवाल त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *