Wed. Aug 10th, 2022

‘शरद पवार यांनी अमरावतीत पाय ठेवू नये’ – अनिल बोंडे

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासुन विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावर भाजप नेते तसेच माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी अमरावती आणि विदर्भाच्या दौऱ्यावर न येण्याची प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली आहे.

  ‘शरद पवारांनी अमरावतीमध्ये पाय ठेवू नये तसेच शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करीत आहे माहिती नाही. मात्र त्यांनी अमरावती दौऱ्यावर येऊ नये,’ असे अनिल बोंडे यांनी सांगितले आहे. पवार विदर्भ दौऱ्यावर आले की संतप्त शेतकरी त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत तसेच दौऱ्यादरम्यान विदर्भात फिरतानासुद्धा त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी असे अनिल बोंडे यांनी सांगितले आहे.

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. नवाब मलिकांनी क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यावेळी शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता भाजपविरोधी प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी मलिकांना पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.