Wed. Jun 26th, 2019

भाजपच्या पराभवाचं शरद पवारांकडून विश्लेषण

0Shares

आपल्या वाढदिवसानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या पराभवाचंही विश्लेषण केलं. 2014 च्या निवडणुकीपूर्वी मोदींनी जनतेला दिलेली आश्वासनं मोदी पूर्ण करू शकले नाहीत. उलट त्याऐवजी गांधी कुटुंबाला लक्ष्य करत राहिले, याचाच परिणाम विधानसभा निवडणुकांवर झाल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

सध्या देशात काळजी करण्यासारखं वातावरण असल्याचंही पवार यांनी म्हटलं. विरोधकांवर टीका करताना पंतप्रधानपदावरील व्यक्तीने काही मर्यादा पाळणं अपेक्षित असतं. मात्र मोदींना त्याचा विसर पडला. आपण केलेल्या आश्वासनांबद्दल बोलण्याऐवजी त्यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर आक्रमक भाषा वापरत टीका केली. धमकीचे सुर लावले. हे मतदारांना पसंत न पडल्याने त्यांनी भाजपचा पराभव केल्याचं पवार यांनी म्हटलं.

तसंच देशात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचंही पवार यांनी म्हटलं.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: