Fri. Aug 12th, 2022

शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही – हसन मुश्रीफ

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार असल्याची चर्चा सुरू असताना पवार देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपशकुन तरी करू नये असे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या शिवजयंती नियोजन मेळाव्यात हसन मुश्रीफ यांनी असे वक्तव्य केले आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले ?

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी पुण्यात बैठक घेतली.

या बैठकीत शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवावी असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला.

या बैठकीत के. पी. पाटील, धनंजय महाडिक, जयंत पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.

डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यावरून आ. हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांशी चर्चा केली.

त्यावेळी शरद पवार म्हणाले, ‘डी. वाय. पाटील म्हणत होते की, माझी आत्मिक शक्ती प्रबळ आहे. या वेळेस पंतप्रधान शरद पवार होतील. पवार पंतप्रधान होणे आणि मी राष्ट्रवादीत नसणे हे बरोबर नाही’ यामुळे ते राष्ट्रवादीत आले.

राहुल गांधी यांच्या नावावर पंतप्रधानपदासाठी एकमत होण्याची शंका आहे. मात्र शरद पवार यांच्या नावावरच होईल. लोकसभेत निवडून आलेल्या माणसालाच पंतप्रधानपद शोभादायी ठरेल.’

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.