Wed. Aug 4th, 2021

शरद पवार माढामधून निवडणूक लढणार नाही

आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांतच असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. ‘कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी माढ्यातून लढणार होतो. मात्र पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली नाही’ असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत माढा मतदार संघातून निवडणूक लढणार नसल्याची घोषणा शरद पवार यांनी केली.

मी माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली नाही.

एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून माघार घेत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

नव्या पिढीला उमेदवारी देण्याचा पवार कुटुंबाने  निर्णय घेतला आहे.

यामुळे पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

काही जागांबाबत वाद सुरू आहे. मात्र हा वाद संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *