Tue. Oct 27th, 2020

शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, काय लिहिलंय पत्रात?

‘सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे आणि संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत’ अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय.

राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्याची वेळही शरद पवार यांनी पत्राद्वारे मागितली आहे.

 

शरद पवार यांचा दुष्काळ दौरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचा रणसंग्राम संपताच दुष्काळी दौरा केला होता.

शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर थेट जात आणि चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या, मालकांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या जाणून घेतलेल्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याचाही उल्लेख केला आहे.

त्याचप्रमाणे चाराछावणी साठी येणाऱ्या खर्चाचादेखील तपशील शरद पवार यांनी या पत्रात केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *