Fri. May 29th, 2020

VIP लोकांच्या कार्यक्रमात पोलिसांना उभं ठेवू नका, शरद पवार यांचं गृहमंत्र्यांना पत्र

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता राज्यातील पोलिसांचा प्रश्न गृहमंत्र्यांकडे मांडला आहे. पोलिसांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून केली आहे.

जाहीर सभा किंवा दौऱ्यांच्या वेळी VIP लोकांच्या येण्याजाण्याच्या वेळी पोलिसांवर विशेष ताण असतो. तसंच कार्यक्रमादरम्यान त्यांना तासन् तास थांबावं लागतं. त्यातही विशेषतः महिला पोलिसांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनाही असं उभं राहणं आपल्याला उचित वाटत नाही, असं मत शरद पवार यांनी पत्रातून व्यक्त केलं आहे.

त्यामुळे सभा शांतते सुरू असताना पोलिसांसाठी आसनाची व्यवस्था करण्यासाठी संयोजकांना मार्गदर्शक सूचना कराव्यात, असं या पत्रात नमूद केलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच महिला आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आसन व्यवस्था मिळण्यासंदर्भात गृह विभागातर्फे परवानगी असावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *