Sun. Jun 20th, 2021

CAA मुळे धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता- शरद पवार

#CAA आणि #NRC विरोधात देशभरात आंदोलनं होत आहेत. सरकारच्या नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात विद्यार्थ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक विविध जाती, धर्मांचे, वयाचे लोक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) तसंच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही भूमिका मांडली. आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सरकारवर निशाणा साधत CAA ला विरोध केलाय.

अर्थव्यवस्था संकटात म्हणून CAA चा विषय’

अफगाणिस्तान (Afganistan), पाकिस्तान (Pakistan), बांग्लादेश (Bangladesh) यांसारख्य़ा देशांतील ठराविक धर्मांच्याच लोकांवर #CAA कायद्याने लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शंका शरद पवार यांनी उपस्थित केली.

देशासमोर आज अनेक गंभीर समस्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे.

त्यावरील लक्ष हटवण्यासाठीच CAA चा विषय पुढे आणला आहे, असा आरोप शरद पवार यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *