Fri. Aug 12th, 2022

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पवारांचा नकार

देशाच्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी निवडणुका होणार आहेत. तर, राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. मात्र, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी नकार दर्शवला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या बैठकीत शरद पवारांनी हे मत मांडल आहे.

‘मी राष्ट्रपती नियुक्तीच्या शर्यतीत नसून राष्ट्रपती पदासाठी उमेदवार होणार नाही,’ शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कधी होणार निवडणूक?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी निवडणूक होणार आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून २१ जुलै रोजी देशाच्या नव्या राष्ट्रपतींची नियुक्ती होणार आहे. दरम्यान, २९ जूनपर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

पवारांना काँग्रेसचा पाठिंबा, भुजबळ आनंदी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीसाठी पाठिंबा दिला आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार राष्ट्रपती होणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातून शरद पवार हे राष्ट्रपती यासारख्या मोठ्या पदावर गेल्यास महाराष्ट्र नक्कीच आनंदाची व गर्वाची गोष्ट करता राहील, असे छगन भुजबळ म्हणाले.

आम आदमी पार्टीची पवार राष्ट्रपती होण्याची इच्छा

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस पाठोपाठ आम आदमी पार्टीनेही पवार राष्ट्रपती व्हावेत अशी इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना खूप आनंद झालाय.

पवार राष्ट्रपती भवनात स्वत:ला कोंडू शकत नाहीत – आव्हाड

शरद पवार राष्ट्रपती झाल्यास महाराष्ट्राचा सन्मान असले, असे मत काही घटक पक्षांनी व्यक्त केलं आहे. मात्र, असे असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना राष्ट्रपती करू नये, असे म्हटले आहे. पवार राष्ट्रपती भवनात कोंडू शकत नाहीत, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.